बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी टोळी उघडकीस
दोघांना अटक अन्य पसार
। अहमदनगर । दि.06 जुलै 2023 । शहरातील पुणे बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पाथर्डी शहरातून अटक केली. रोहन बाळ हंडाळ (वय २५, रा. हंडाळवाडी, पाथर्डी, जि.अ.नगर), एकनाथ महादेव मासाळकर (वय ४२, रा. विजयनगर, पाथर्डी जि.अ.नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
या बाबतची माहिती अशी की अंशुल नंदकुमार राऊत (वय-२७ वर्ष, रा. कांदीवली, मुंबई) या प्रवाशाची पुणे बसस्थानक येथून बसमध्ये चढताना १८ जून २०२३ रोजी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेली होती. अंशुल राऊत यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
अवघ्या दहा दिवसात महावितरणकडून एक लाख घरगुती वीज कनेक्शन
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोरी करणारे आरोपी हे पाथर्डी शहरातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यादव यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपींना पाथर्डी शहरातून अटक केली आहे. दोघांनी मिळून आणखी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून, चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपींवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे काही साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
‘भाजपला साथ-सर्व गुन्हे माफ‘ धोरणाचा निषेध
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस नाईक शाहीद सलीम शेख, आनंद दाणी, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, दिपक रोहकले, सोमनाथ केकान, सायबर सेलचे पोलिस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.
