। अहमदनगर । दि.08 जुलै 2023 । कैलास नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद गोरख पर्वते यांची कन्या ऋतुजा गोरख पर्वते ही एमबीबीएस ही पदवी काझगिस्तान या देशातील आयएसएम युनिर्व्हीसिटीमधून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिचा पतसंस्थेच्या संचालिका जयश्री बिडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक शंकर मिसाळ, वसुली अधिकारी सचिन दिवटे, कॅशिअर हरिप चवंडके, गोरख पर्वते आदी उपस्थित होते. यावेळी ऋतुला यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
जयश्री बिडकर म्हणाल्या, कैलास नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासद, ठेवीदार, कर्जदारांना आधुनिक सुविधांच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. सर्वसामान्यांना आर्थिक पत निर्माण करण्याचे काम पतसंस्था करीत आहे. त्याचबरोबर सभासद व त्यांच्या कुटुंबाच्या विकासासाठी पतसंस्था कटिबध्द आहे.
आणखी एक मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरे यांची साथ
सभासदपाल्य ऋतुजा पर्वत हिने अतिशय परिश्रमातून एमबीबीएस परीक्षेत मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. याप्रसंगी व्यवस्थापक शंकर मिसाळ यांनी पतसंस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सचिन दिवटे यांनी सूत्रसंचालन केले तर हरिष चवंडके यांनी आभार मानले.
Tags:
Ahmednagar
