कायनेटिक चौकातील कारंजात मालट्रक घुसला


। अहमदनगर । दि.07 जुलै 2023
  नगर-पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकात असणार्‍या सर्कलवर मंगळवारी दि.4 रोजी मालहवाहतूक ट्रक घुसला. यामध्ये सर्कलचे मोठे नुकसान झाले. या अपघातात ट्रक चे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाहीं. ही घटना नगर पुणे रोड वरील कायनेटिक चौक येथे घडली. 

साईचरणी 3 दिवसामध्ये 7 कोटींचे दान

या बाबतची माहिती अशी की नगर कडून पुण्याकडे भरवेगात जाणार्‍या मालट्रक ( क्रमांक एम एच 28 बी बी 3033 ) वरील नियंत्रण सुटल्याने मालट्रक कायनेटिक चौकातील कारंजात घुसला या अपघातात मालट्रकचे पुढील लोखंडी पाटे तुटून दोन्ही चाके तुटली. 

तीन वर्षे अकरा महिन्यांच्या अन्वीकडून ‘कळसूबाई‘ सर

या वेळी सुदैवाने पुणे महामार्गावर रहदारी नसल्याने जीवित हानी टळली. अपघात होताच कायनेटिक चौकातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी ट्रकचालकास बाहेर काढले. त्यानंतर ट्र्क बाहेर काढण्यासाठी दोन क्रेंन आणले .आणि ट्र्क बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु माल भरलेला ट्र्क बाहेर निघाला नाही.   

बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी टोळी उघडकीस  

Post a Comment

Previous Post Next Post