पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांचे औक्षण


। मुंबई । दि.08 जुलै 2023 । राज्याच्या सत्तासंर्षामध्ये पवार विरुद्ध पवार असे राजकारण पहायला मिळत असले तरी दुसर्‍या बाजुला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात दिलजमाई झाल्याचे पहायला मिळत आहे.धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना साथ देत राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता सोशल मीडियावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राजकीय मैदानात बहिण-भावामध्ये शाब्दीक लढा आणि वैचारीक लढा जरी पाहायला मिळत असला तरी आता पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांचे औक्षण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पंकजा मुंडे यांनी औक्षण करतानाचा व्हिडिओ स्वत: धनंजय मुंडे यांनी ट्विट केला आहे. राज्याच्या मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post