एमआयडीसीतील वर्कशॉपमधून ऑईल चोरणारा ताब्यात


। अहमदनगर । दि.07 जुलै 2023 । एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकात वाहन दुरुस्तीच्या वर्कशॉपमधून ऑईलची चोरी करणार्‍या कामगाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. 24 हजार रुपये कितीचे 59 लिटर ऑईल पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केले आहे. 

कायनेटिक चौकातील कारंजात मालट्रक घुसला

वर्कशॉपमधून ऑईल चोरी झाल्याची फिर्याद प्रदीप अणाजी सोनवणे (रा. भिस्तबाग चौक, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार साईनाथ टेमकर हे करीत असताना फुरकन मोहमंद अली (वय 19, जामुनामुख जि. नागाव, आसाम) याने ऑईलची चोरी केल्याची कबुली दिली. 

साईचरणी 3 दिवसामध्ये 7 कोटींचे दान

चोरी गेलेले 24 हजार रुपये किमतीचे ऑईल आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक दीपक पाठक, साईनाथ टेमकर, सुरेश सानप, उमेश शेरकर यांनी ही कारवाई केली.

बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी टोळी उघडकीस  

Post a Comment

Previous Post Next Post