। अहमदनगर । दि.13 फेब्रुवारी । नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.
हे देखील वाचा...ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी उपोषण केले स्थगित
घोडेगाव उपबाजार समितात काल शनिवारी ४२ हजार ११३ गोण्या कांद्याची आवक झाली. एक-दोन लॉटला ३६०० ते ३८५० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
हे देखील वाचा...श्रीगोंद्यामध्ये कार-ट्रेलरवर धडकुन 3 मित्रांचा मृत्यू
मोठ्या कलरपत्ती कांद्याला २८०० ते ३३०० रुपये, मुक्कल भारी कांद्याला २६०० ते २७०० रुपये, गोल्टी कांद्याला १८०० ते २१०० रुपये, जोड कांद्याला ३०० ते १००० रुपये तर हलका डॅमेज कांद्याला २०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.
हे देखील वाचा...शिल्पकार कांबळे यांना जीवन साधना पुरस्कार
कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी दिसत होते. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कृषीराजा सुखावला आहे.
हे देखील वाचा...नातवाच्या अपघाती निधनाच्या धक्क्याने अजोबांचा मृत्यू