। अहमदनगर । दि.13 फेबु्रवारी । मित्राला सोडविण्याकरिता जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून जोरात कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये 3 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना रविवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास श्रीगोंद्यातील हॉटेल अनन्यासमोर घडली आहे. या भीषण अपघातात राहुल सुरेश आळेकर (वय- 22 ,श्रीगोंदा), केशव सायकर (वय- 22, काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय- 18, श्रीगोंदा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
आकाश आणि राहुल हे केशव सायकरला सोडविण्याकरिता काष्टीला जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने श्रीगोंदा काष्टीत मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Tags:
Breaking