। अहमदनगर । दि.13 फेब्रुवारी । राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. परंतु अण्णांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली. तसेच ठराव देखील राळेगणसिध्दीत आजच्या ग्रामसभेत करण्यात आला सर्व परस्थितीचा आढावा घेऊन अण्णांनी आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा...श्रीगोंद्यामध्ये कार-ट्रेलरवर धडकुन 3 मित्रांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे अण्णांनी पत्रात म्हटले होते.
हे देखील वाचा...सोनाराचे दुकान फोडून चांदीचे दागिने लांबवले
ग्रामसभेमध्ये राळेगण-सिद्धी परिवाराने अण्णांचे 84 वय इतके असताना आता उपोषण आंदोलन करू नये अशी विनंती केली त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कच्या काही वरिष्ठ अधिकार्यांनी शनिवारी अण्णांची भेट घेऊन एक लेखी पत्र अण्णांना दिले आहे. त्या पत्रात राज्य सरकारने वाईन विक्री याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून नागरिकांचे मते आजमावून त्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे आणि त्यानंतर सरकार याबाबतची घोषणा करणार आहे, तूर्तास याबद्दल सरकारने वाईन विक्रीला सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये परवानगी अद्याप दिली नसल्याचे स्पष्ट केलेला आहे.
हे देखील वाचा...शिल्पकार कांबळे यांना जीवन साधना पुरस्कार
Tags:
Breaking