अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाखाचा हातभार


। अहिल्यानगर । दि.17 डिसेंबर 2025 । अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाष्ट्रातील विविध जिल्हयात विशेषतः अहिल्यानगर, विदर्भ, मराठवाडयामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरात तेथील सामान्य जनजिवन बाधीत झाले. तसेच मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान व जीवीत हानी झाली आहे. राज्यातील या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या अपतग्रस्तांना सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री सहायता निधीस बँकेच्या सेवकांनी एक दिवसाचा पगार रुपये १६.१८ लाख व बँकेच्या स्वनिधीतून ९४.८२ लाख असा १ कोटी ११ लाखाचा चेक राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, जिल्हयाचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आज मुंबई येथे सुपूर्त करण्यात आला. 

याप्रसंगी बँकेचे चेअरमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, बँकेचे  संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे, संचालक माजी आमदार राहुल दादा जगताप, संचालक अंबादास पिसाळ, संचालक अमोल राळेभात, संचालक अक्षय कर्डिले व इतर मान्यवर उपस्थित होते.

बँक सातत्याने सामाजिक भुमिकेतून नेहमीच राज्याच्या व देशाच्या संकटकालीन आपत्ती परिस्थितीत मागे न राहता वेळोवेळी सामाजिक दायित्व निभावते, अशी माहिती बँकेचे चेअमन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली. त्यांनी माहिती देताना पुढे सांगितले केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी, राज्यातील सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीसमयी, कोविड १९ विषानु संसर्गीय लागणीमुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थितीत तसेच कोविड १९ दुस-या लाटे प्रसंगी अशा अनेक प्रसंगी बँकेने भरीव मदत करण्याचे काम बँकेच्या सेवकांनी व बँकेने स्वनिधीतून वेळोवेळी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post