। अहमदनगर । दि.13 जानेवारी । घरात ठेवलेली 1 लाख 20 हजार 500 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील मॉडर्न कॉलनी, स्वामी समर्थ मंदिराजवळ घडली.
हे देखील वाचा...अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा लॉकडाऊनला विरोध
याबाबत किरण अमरलाल दर्डा ( रहाणार मॉडर्न कॉलनी गुलमोहोर रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आपण 28 डिसेंबर रोजी 11 वाजता ते 29 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत घरात 90 हजार रुपयांची रोकड ठेवली होती.
हे देखील वाचा...नगर-सोलापूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
त्यानंतर पुन्हा 2 जानेवारी रोजी आणखी 30 हजार 500 रुपयांची रोकड घरातील कपाटामध्ये ठेवण्यात आली होती. सदरची रोकड अज्ञात चोरट्याने घरातील व्यक्तींची नजर चुकवून चोरुन नेल्याचे निदर्शनास आल्याने दर्डा यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
हे देखील वाचा...राहुरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! ; तीन महिलांची सुटका
या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार गिरीष केदार करीत आहे.
हे देखील वाचा...आज 115 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या बाधितांची रुग्ण संख्येत कितीने भर