। अहमदनगर । दि.14 जानेवारी । नगर जिल्ह्यामध्ये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चायना मांजाला बंदी घालण्यात आलेली आहे. असे असताना देखील अनेक ठिकाणी सर्रासपणे चायना मांजाची विक्री सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून साहित्य जप्त केले आहे. अशीच कारवाई नगर शहरातही सध्या सुरू झालेली आहे.
संक्रांतीच्या दिवशी नगर शहर जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. मात्र, अलीकडच्या काही वषारत चायना मेड नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे.
पर्यावरण व नागरिकांच्या जीविताला धोकादायक असल्याने चायना मांजाच्या दोन ठिकाणाहून चायना मांजा जप्त वापरावर व विक्रीवर निबरध आहेत. तरीही जिल्हाभरात चायना मांजाची विक्री सर्रास सुरू आहे.
दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेने सुद्धा चायना मांजाला अटकाव करत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तर दुसरीकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने सुद्धा चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई मोहीम हाती घेतलेली आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या अधिपत्याखाली हद्दीमध्ये अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. भिंगार परिसरातील सुमारे 25 ते 26 दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली.
यात दोन ठिकाणी चायना मांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोहेकॉ अजय नगरे, पोना राहुल द्वारके, पोना भानुदास खेडकर, पोकॉ काळे, मपोकॉ जाधव, पोना राहुल गोरे आदींच्या पथकाने केली.
कोपरगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई
नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी बंदी घातलेली असताना कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या पतंग असारी विकणाऱ्या तुळशीदास शिवलिंग पवार, रा. पवार सरकार वाडा याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडे नायलॉन मांजाची चार रिळ प्रत्येकी पाचशे रुपये किंमत एकूण किमत दोन हजार रुपये किमतीचा मांजा जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले आहे, अशी माहिती फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल विलास मासाळ यांनी दिली. पवार विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.