राहुरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! ; तीन महिलांची सुटका

पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई


। अहमदनगर । दि.13 जानेवारी । राहुरीत एकाच वेळी दोन ठिकाणी वेश्या व्यवसायावर छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका तर दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची ही कारवाई केली आहे.

राहुरी येथील हॉटेल न्यू भारत तसेच राहुरी ते शिर्डी जाणारे रोडवर हॉटेल न्यू प्रसादचे शेजारी सेक्स रॅकेट वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. याबाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचा समक्ष छापा टाकून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचारी स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद फरहाद इरशाद अहमद (वय 34, रा. बुवासिंद बाबाचा दर्गासमोर राहुरी) याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू शिवाजी इंगळे (रा. इंदिरानगर, वॉर्ड नंबर 6, श्रीरामपूर) याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, मधुकर साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, गणेश फाटक, इफ्तेकार सय्यद, चा. पो. कॉ. चाँद सय्यद, स्वाती कोळेकर, मीना नाचन यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post