स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चारचाकी, दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद

चारचाकी, दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद

। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई । 15 लाखांचा मुद्देमाल जप्त


। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर । अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, सोनई, शेवगाव परिसरातून तसेच जालना, नाशिक व औरंगाबद जिल्ह्यातून चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. संजय रावसाहेब चव्हाण (रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल झाले आहे. त्याच्याकडून 14 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा...धक्कादायक : प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने देखील गळफास घेत केला शेवट

फिर्यादी सादिक इब्राहिम पठाण, वय 49 वर्ष, धंदा गाडी खरेदी विक्री, रा. काझीबाबा रोड, सुलतान नगर, ता. श्रीरामपूर यांचा सुपर ऑटो कन्सल्टंट या नावाने पराग टॉवर्स, श्रीरामपूर येथे जुने चारचाकी वाहनांचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.त्यांचे ओळखीचे जनार्दन रामचंद्र बाबर (रा. भिंगार, ता. जि. अहमदनगर) यांनी त्यांची महिंद्रा बोलेरो मालवाहतुक गाडी (क्र. एमएच 16 एवाय 4790) ही विक्री करण्यासाठी गाडीचे कागदपत्रांसह फिर्यादी यांच्याकडे दिली होती. 

हे देखील वाचा...तुळशीच्या झाडावर थुंकू नको म्हणाल्याच्या रागातून मारहाण 

सदरची पिकअप फिर्यादी पठाण यांनी त्यांचे श्रीरामपूर येथील कार्यालयासमोर उभी केली असतानाकोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरची घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले. पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून 

हे देखील वाचा...कंपनीच्या इंजिनियरला कामगाराची बेदम मारहाण

आरोपींची माहिती घेत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून संजय रावसाहेब चव्हाण रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर याने व त्यांचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ मनोज गोसावी, पोना संतोष लोढे, दीपक शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ रविंद्र घुंगासे, रणजीत जाधव, सागर ससाणे, जालिंदर माने, चापोहेका उमाकांत गावडे, पोना भरत बुधंवत अशांनी मिळून आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून सापळा रचला. 

हे देखील वाचा...एसटीच्या इतिहासातील सर्वाधिक वेतनवाढ

संजय रावसाहेब चव्हाण, वय 30, मुळ रा. रांजणी, ता. शेवगांव हल्ली रा. ब्राम्हणगांव. ता. श्रीरामपूर यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. शेवगाव, नेवासा, सोनई, अंबड, जिल्हा जालना, पैठण, जिल्हा औरंगाबाद या ठिकाणाहून यापूर्वी डीव्हीआर, मोबाईल, कॉम्प्युटर, मोटारसायकल, पीकअप अशा वाहनांची व साहित्यांची चोरी केल्याची माहिती दिली.

हे देखील वाचा...राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान 

Post a Comment

Previous Post Next Post