भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकाला धडकली


। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर ।  नगर औरंगाबाद रोडवर आज गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास भरघाव वेगाने जाणारी कार दुभाजकावरील खांबास धडकली कारच्या दर्शनीय भागाचे मोठे नुकसान झाले असून या कारमधील 4 जण सुदैवाने वाचले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि पुण्यावरून अमरावती कडे जाणारी कार एम.एच.14 इ.यु.7180 आज सकाळी वसंत टेकडी समोर एका दगडामुळे त्यावरून गेल्याने व गाडी वेगात असल्याने दुभाजका वरील खांबास धडकली.

यामधून प्रवास करणारे दिलीप तुरसेलवार त्यांचा 10 वर्षाचा मुलगा 14 वर्षाची मुलगी व चालक या मोठया अपघातातून वाचले आहेत. धडक इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

डिझेल पाईप फुटला मात्र प्रवास करणारे चारही जण सुखरूप आहेत. हे प्रवासी अमरावती येथे लग्नासाठी चालले असताना अपघाताचे विघ्न मात्र आले तरी दैव चांगले म्हणून सर्व जण वाचले.

Post a Comment

Previous Post Next Post