। अहमदनगर । दि.25 नोव्हेंबर । प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने देखील आपल्या आयुष्याचा अंत केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना समोर आली असुन अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यामध्ये हा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अहमदनगर मधील जामखेड तालुक्यामध्ये घडली आहे. मृतक मुलगी ही अल्पवयीन आहे. मृतक मुलगा आणि मुलगी यांचे दोघांचे प्रेमसंबंध होते.
अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियेसीच्या आत्महत्येची माहिती मुलाला कळताच त्याने देखील शेतातीत लिंबाच्या झाडाला गळफास घेत आयुष्याचा अंत केला आहे.
मृतक मुलगी ही 16 वर्षांची होती, तर मुलगा देखील 17 वर्षांचा आहे. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी देखील एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
मात्र, मुलीने आत्महत्या का केली याविषयी आणखी माहिती मिळू शकली नाही. पण या मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळातच मुलाने देखील गळफास घेत आयुष्य संपवले आहे. आपल्या प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मुलाला मिळाली.
प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने मुलाने आपल्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला व आयुष्य संपवले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
Tags:
Ahmednagar