| मुंबई | दि.22 जुन 2024 | राज्यातील विविध जिल्ह्यात तब्बल १७ हजार ४७१ पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र ऐन पावसाळा सुरू असतांना मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. अनेक मैदानांत चिखल असतांना विद्यार्थ्यांनी सराव कुठे करावा आणि ऐन पावसात मैदानावर चाचणी कशी द्यायची असा सवाल उपस्थित होत होता.
👉 खासदार निलेश लंके यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र
मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊस असणार्या जिल्ह्यात पोलिस भरती पुढे ढकलण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलिस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील.
👉 रील्स बनविण्याच्या नादात तरुणीने गमावला जीव
कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.
Tags:
Maharashtra
