| पुणे | दि.15 जुन 2024 | राज्यात मान्सून दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पावसामुळे सर्वत्र वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. याच बरोबर आता काही ठिकाणी नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
शनिवारी राज्यात पावसाची स्थिती कशी असेल याबाबचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील अनेक भागात उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकणात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यामधील या जिल्ह्यांना यलो अलर्ट
रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वार्यासह पावसाची शक्यता आहे.
👉 शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि पत पुरवठा वेळेवर करा : पवार
