पार्थ पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी शपथ
। नवी दिल्ली । 09 एप्रिल 2026 । राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते पार्थ अजितदादा पवार यांनी नवी दिल्ली येथे राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली आहे. पार्थ पवार यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळा राज्यसभेच्या सभागृहात पार पडला.
या शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार यांच्या पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष ओळख असलेले ’गुलाबी जॅकेट’ परिधान केले असल्याचे पाहीला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. श्री. पार्थ अजितदादा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. देशाचे उपराष्ट्रपती मा.श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली.
Tags:
Breaking
