| अहमदनगर | जामखेड | दि.21 जुन 2024 | रस्त्यावरून जाणार्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा शॉक बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. प्रसंगावधान राखून पती व पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या अपघातातून थोडक्यात वाचले. ही दूर्दैवी घटना जामखेड तालुक्यातील वाघा गावात २० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
नगर-दौंड महामार्गावर कार जळून खाक
या बाबत अधिक माहिती अशी की वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून सकाळी शेतात गेले होते. दिवसभर शेतातील काम करून सायंकाळी आपल्या घरी परतत होते. यावेळी पाऊस देखील सुरु होता. तसेच बैलगाडीत गवताचे भारे टाकुन पती पत्नी हे बैलगाडीतून आपल्या घरी येत असतानाच वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीजप्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता.
उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी फेरनियुक्ती
यावेळी बैलगाडी या पाण्यातून जात असतानाच अचानक या बैलांना विजेचा धक्का बसल्याने बैलगाडीला जुंपलेल्या दोन्हीही बैलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून बैलगाडी मध्ये गवताच्या वरती बसलेल्या पती पत्नी यांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते बालंबाल वाचले आहेत.
खासदार निलेश लंके यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र
शेतकर्याच्या दोन्ही बैलांचा या अपघातात दुर्दैवी झाल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने घटनेचा पंचनामा करावा व शेतकर्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.
