रील्स बनविण्याच्या नादात तरुणीने गमावला जीव

। छत्रपती संभाजीनगर ।  दि.18 जुन 2024 । रील्स बनविण्याच्या नादात अनेक छोटे-छोटे अपघात घडलेले आपण पाहतो मात्र रील्स  बनवण्याच्या नादात एखाद्याचा जीवन गेला हे समोर येत आहे. रील्सच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला असल्याचे आता समोर आले आहे. संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली आहे. श्वेता दिपक सुरवसे (२३ वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे.

सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना ...

मिळालेली माहिती अशी की, श्वेता दिपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभंजन इथं दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती. रील बनवताना कार दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील सुलीभंजन दत्त मंदिराजवळ ही घटना घडली आहे.

स्कोडा कार चालकाने पाच जणांना उडविले

मोबाईलवर रील्स बनवताना श्वेताने कार चालवण्यासाठी घेतली. कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अ‍ॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर कार दरीत कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

दोन दुचाकी वाहनाच्या अपघातात एक ठार

सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणार्‍यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रिल्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रिल्स करतात.

...कडी - कोयंडा तोडून दागिण्यांवर डल्ला 

Post a Comment

Previous Post Next Post