अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
। अहिल्यानगर । दि.06 एप्रिल 2026 । राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांनी आज भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, विक्रमसिंह पाचपुते, सुरेश धस, महापौर ज्योती गाडे, सुभाष पाटील, संदीप कर्डिले, उपस्थित होते.
भाजपाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (दि.6) अखेरची मुदत होती. अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी अक्षय कर्डिले यांच्या आई अलकाताई कर्डिले यांनी त्यांचे औक्षण करून आशीर्वाद दिले. आईची गळाभेट घेताना अक्षय कर्डिले भावूक झाले होते.
Tags:
Breaking
