पावसाची हजेरी ; शेतकर्‍यांमध्ये समाधान


। अहमदनगर ।  दि.12 जुन 2024 । नगर तालुक्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावर आहे. पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरु झाली आहे. यंदा पावसाचा अंदाज चांगला असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

👉 मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

दोन दिवस तालुक्यात पावसाने बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली. यामुळे मुग, सोयाबीन, बाजरी, तुर पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. तर काही भागात पेरणीसाठी वापसा होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

👉  राज्यात अतिवृष्टीचा इशारा : मुसळधार पावसाचा अंदाज

तालुक्यात सर्वदुर पावसाची हजेरी लागल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मृग नक्षत्रामध्ये झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना खरीपाबरोबरच रब्बी पिकाचेही नियोजन करता येणार येते.  सलग दोन वर्ष पावसाने शेतकर्‍यांची निराशा केली. मात्र यंदा पावसाने साथ द्यावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

👉  विजयी हॅट्रिकसह नितीन गडकरी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ  

Post a Comment

Previous Post Next Post