शिवसेना शहर प्रमुखाची फसवणूक : गुन्हा दाखल

। अहमदनगर ।  दि.12 जुन 2024 । जमीन खरेदी प्रकरणी 25 लाख रुपये घेत साठेखत करुन दिले. मात्र ते साठेखत रद्द न करता आणि घेतलेले 25 लाख रुपये परत न करता सदर जमिनीची अन्य एकाला विक्री करुन 6 जणांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नगर शहर प्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते (वय 49, रा.भूषणनगर, केडगाव) यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

👉 वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

याबाबत सातपुते यांनी सोमवारी (दि.10) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंकुशराव जयवंतराव नागरे, जालिंदर जयवंतराव नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे, शांताबाई बाळासाहेब नागरे, कविता संजय फुंदे, राजकुमार अंकुशराव नागरे (सर्व राहणार संगम जवळगाव, ता.गेवराई जि.बीड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

👉  सोन्याचे भाव गगणाला भिडले  

Post a Comment

Previous Post Next Post