मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

। जालना ।  दि.10 जुन 2024 । मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा देत म्हटले आहे की, लोकसभेला फजिती कमी झाली, मात्र विधानसभेला आणखी जास्त होईल असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

👉 राज्यात अतिवृष्टीचा इशारा : मुसळधार पावसाचा अंदाज

मनोज जरांगेयांना मराठा समाजाला सगेसोयर्‍यांचे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी ८ जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले होते. सोमवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयर्‍यांचे आरक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

👉 खासदार नीलेश लंकेंच्या विजयाचा शिवसैनिकांमधून जल्लोष 

Post a Comment

Previous Post Next Post