। जालना । दि.13 जूल । लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. आज उपोषणाचा सहावा दिवस होता. मराठा आरक्षणातील सगेसोयर्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आता एक महिन्याचा वेळ मागितला आहे.
त्यासाठी राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर 30 जूनच्या आत सर्व गोष्टी रितसर करून घ्या, अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केल्या.
राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेची भेट घेऊन त्यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच, मी प्रथमच तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही सरकारला 2 महिन्यांचा अवधी द्यायला हवा, अशी मागणी देसाई यांनी केली होती. त्यानंतर, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 1 महिन्याचा अवधी दिला असून आपले उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.
Tags:
Breaking
