या बाबतची माहिती अशी की सौ.कल्पना गणेशमल धाडीवाल (वय-49 वर्षे रा. सोनानगर चौक, सावेडी, अ.नगर) या सरस्वती बचत गट या गटाची सभासद असुन त्या बचत गटाचे पैसे शहर बँकेत जमा करित असतात.
मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन
दि.13 रोजी बचत गटाचे दहा हजार रुपये शहर बँकेत जमा करायचे असल्याने ते पर्स मधील पॉकीट मध्ये ठेवले.बँकेत जात असताना माळीवाडा विशाल गणपती मंदिरात आरती चालु असल्याने त्या दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्या. व मंदिरात खुप गर्दी असल्याने थोडावेळ थांबुन मंदिराच्या बाहेर आल्या. व डोक्याला टिळा लावुन त्याला पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला असता त्यांना पर्समध्ये ठेवलेले पॉकेट मिळुन न आल्याने त्यांनी मंदिरात व मंदिर परिसरात शोध घेतला असता त्यांना पॉकेट सापडले नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवुन पर्स मधुन पॉकेट चोरुन नेले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून आ.शंकरराव गडाख यांचे कौतुक
या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात कल्पना धाडीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 379 अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.
