महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिवपदी गोवर्धन पांडुळे यांची बिनविरोध निवड


। अहमदनगर । दि.29 नोव्हेंबर 2023 । पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या निवडणुकीमध्ये सिताराम सारडा विद्यालयातील वरिष्ठ लिपिक गोवर्धन पांडुळे यांची पुणे विभागाचे सचिव पदी फेरनिवड झालेली आहे. 

या निवडणुकीमध्ये राज्य अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह  शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांच्या बिनविरोध फेरनिवडी झाल्या. गोवर्धन पांडुळे हे गेले अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर सेवक संघामध्ये कार्यरत असून २०१९ पासून पुणे विभागीय सचिव म्हणून काम करत आहेत.

या कालावधीमध्ये गोवर्धन पांडुळे यांनी शिक्षकेतर बांधवांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलनामध्ये घेतला  तसेच शासनस्तरावर विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे, या पदावर काम करत असताना राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना सोबत घेऊन काम करत असल्याने त्यांची फेरनिवड झालेली आहे. 

त्यांच्या निवडीबद्दल हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अॅड अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, मधुसूदन सारडा, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सुमतीलाल कोठारी, अनंत देसाई, डॉ.पारस कोठारी, विद्यालयाचे चेअरमन मकरंद खेर, सहाय्यक सचिव योगेश देशमुख, 

बाळासाहेब कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी, पर्यवेक्षक किशोर खुरंगे, प्राथ.मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल, सचिव भानुदास दळवी व सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post