स्मायलिंग अस्मितामुळे छ्त्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाला झळाळी प्राप्त : कवडे

 स्मायलिंग अस्मितामुळे छ्त्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाला झळाळी प्राप्त : कवडे

स्थायी समिती सभापती गणेश कवडेंच्या निधीतून सुशोभीकरणास प्रारंभ

।अहमदनगर । दि.30 नोव्हेंबर 2023 । छ्त्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण माझ्या सभापती पदाच्या कार्यकाळात करता आले हे माझे भाग्य समजतो. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमी लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेत या ठिकाणी विकास आराखडा तयार करून त्यासाठी कुशलतेने निधी मिळवत आहेत; त्यामुळे आज काळाआड गेलेला चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे येत आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन 

संरक्षण भिंतींच्या रंग कामामुळे व व्यासपीठामुळे याठिकाणचे वातावरण नेहमी प्रफुल्लित राहिल असे मत अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेशराव कवडे यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक डॉ सागर बोरूडे म्हटले की जेव्हा जेव्हा महापुरुषांच्या बाबतीत विषय येतो तेव्हा निधी लवकर वर्ग होत नाही; त्यामुळे कामे रेंगाळतात; परंतु सभापती कवडेंनी याठिकाणी तत्परता दाखवली हे कौतुकास्पद आहे. 

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिवपदी .... 

दरम्यान प्रगतशील शेतकरी अमोल गाडे यांनी स्मायलिंग अस्मिता व स्मारक समितीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सभापतींनी निधी दिल्या बद्दल आभार व्यक्त केले. यावेळी संरक्षक भिंतीला मान्यवरांच्या हस्ते रंग लावून कामाचा शुभारंभ झाला‌.

पिंपळगाव येथील मनपाच्या जमिनीची मोजणी व हद्दनिश्चितीचे काम सुरु 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी सांगितले की या ठिकाणी देशातील पहिला स्मारकाचा पायलट प्रोजेक्ट सुरू असून ज्याप्रमाणे शुभारंभ वेगळ्या पद्धतीने झाला तसेच उद्घाटन सुद्धा डिसेंबर महिन्यात अनोख्या शैलीत होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांधकाम व्यावसायिक धिरज कुमटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम पांडूळे यांनी केले.

शोषितांना न्याय देणारे बळीचे राज्य जगभर यावे ; विचारवंत किरणताई मोघे 

 कार्यक्रमाला श्रीदिप हॉस्पिटलचे संचालक डॉ अमित बडवे,रामकृष्ण कर्डीले,सागर देवकर,अभिजित दरेकर,अजय आगवान,हेमंतराव मुळे,श्रीपाद दगडे, राजेंद्र कर्डीले,अक्षय पवार,स्वप्निल ठाकुर आदींसह इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post