। अहमदनगर । 24 ऑक्टोबर 2023 । नगर शहरातील न्यु आर्ट्स कॉलेजच्या समोरच सुरू असलेल्या स्टार बर्ग हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. तोफखाना पोलिसांनी शनिवारी स्टार बर्ग हुक्का पार्लरवर छापा टाकून सहा हजार 775 रूपये किमतीचे हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले आहे.
शाळांच्या परिसरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार
हुक्का पार्लरचा मालक राम बापु भागवत (वय 23 रा. घासगल्ली, कोठला) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत याच्या स्टार बर्ग हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी छापा टाकून कारवाई केली होती. भागवत सह तिघांवर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजकीय नेत्यांना गावबंदी
भागवत याने काही दिवस हुक्का पार्लर बंद ठेवले होते. ते पुन्हा सुरू केल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, योगेश चव्हाण, सतिष त्रिभुवन, सतिष भवर यांच्या पथकाने छापा टाकला.
गरब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई : पो. नि. चंद्रशेखर यादव
भागवत याला ताब्यात घेत त्याच्या विरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भागवत याच्या हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल्यानंतरही त्याने कॉलेज समोरच पुन्हा हुक्का पार्लर सुरू केल्याने अवैधधंदे चालकांना कायद्याची व पोलिसांची भीती नसल्यानें नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
लाभार्थीपर्यत योजना पोहचणे यातच खरा सामाजिक भाव : सौ.धनश्री विखे
