वाहनचालकास लुटले ; दोघे अटकेत


 । अहमदनगर । दि.03 नोव्हेंबर 2023 ।  शहरातील आशीर्वाद कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर अपघातानंतर लूटमार करणार्‍या सराईत गुन्हेगारांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. अविनाश विश्वास जायभाय ( रा. दुधसागर सोसायटी, केडगाव, अहमदनगर), अजित रामदास केकाण (रा. सारसनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

💥 अनिता काळे यांचा रोटरी क्लबच्या नगररत्न पुरस्काराने गौरव

शहरात करपे वीट भट्टीजवळुन आशीर्वाद कॉलनीकडे वाहन चालक अफताब नवाब बागवान (रा. हातमपुरा, अहमदनगर) हे त्याचे नातेवाईकासह अशोक लेलँड मालवाहू टेम्पो (एम.एच.16.सी.डी. 1657) वरुन जाताना वाहनास थांबवून पाण्याचे बाटलीची मागणी करुन पाणी दिले नाही त्या कारणावरुन लोखंडी फायटरने लोखंडी रॉडने, लाकडी दांड्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

💥 क्षीरसागर कुटुंबीयांकडून ब्रिटिश कालीन तलवार ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला भेट

बागवान यांचे कोल्ड्रींक्स धंद्याचे रोख रक्कम 2 लाख 25 हजार रुपये, 10 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, पाकीट त्यातील महत्त्वाचे कागदपत्रे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन, बँक एटीएम कार्ड चोरून नेले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि चंद्रशेखर यादव यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे यांच्याकडे देऊन त्यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचा आदेश दिला. 

💥 मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी पोलीस अंमलदार यांचे मदतीने या गुन्ह्यातील वरील दोघांचा शोध घेत ताब्यात घेतले. दरम्यान, वरील दोन्ही आरोपींनी पोलीस कोठडीत गुन्ह्याच्या वेळी असलेले त्याच्या इतर साथीदारांची माहिती दिली असून, त्याचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोउपनिरीक्षक अिेशनी मोरे, पो.कॉ. प्रमोद लहारे, पो.कॉ. रवींद्र टकले, पो. कॉ. तानाजी पवार, पो.कॉ. सत्यजीत शिंदे, पो. कॉ. दीपक रोहोकले यांनी केली आहे.

💥 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन  

Post a Comment

Previous Post Next Post