८५ वर्षांच्या आजीच्या जिद्दीला सलाम


। अलिबागः । दि.06 नोव्हेंबर 2023 । नातवाशी खेळण्याच्या वयात एका आजीने  गावाच्या प्रश्नासाठी निवडणुकीच्या रिंगणतात उडी घेतली. घरोघर जाऊन त्य़ांनी प्रचार केला. तरुणीशी लढत दिली. समान मते मिळाली; परंतु ईश्वर चिठ्ठीत त्यांचा पराभव झाला. निवडून येता आले नाही, तरी या आजीच्या जिद्दीला अनेकांनी सलाम केला.

नेपाळमध्ये भूकंपामुळे मृत्यूचे तांडव

एखादी गोष्टी साध्य करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला वयाचे बंधन नसते. शिकायला आणि निवडणूक लढवायलाही वय आडवे येत नाहीत. किमान वय ओलांडले, की साध्य ते असाध्य करता येते. गावातील प्रश्न समोर आल्यावर त्यावर तोडगा काढण्यासाठी तरुणांनी नव्हे तर आजीबाईंनी कंबर कसली. आजीबाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. प्रचाहर केला. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उंबरठे झिजवले; परंतु यशाने त्यांना हुलकावणी दिली. या आजीचे नाव आहे, चिमणीबाई दाऊ खरात.

वाहतुकीच्या नियमांची एैसीतैशी!

पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी निवडणूक लढवली. आजीबाई चिमणीबाई  यांना बिनविरोध निवडून येण्याची अपेक्षा होती; परंतु गावातील तरुणी  त्यांच्यासमोर निवडणुकीच्या मैदानात उतरली. त्यानंतर आजीबाईंनी प्रचार सुरू केला. गावातील लोकांनी चांगले मतदान केले. मतमोजणी झाली तेव्हा चिमणीबाई आणि प्रतिस्पर्धी उमेदवारास समान मते मिळाले. अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्यात चिमणीबाई यांचा पराभव झाली. आजीबाईंनी जिद्द दाखवली; पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही.

वाहनचालकास लुटले ; दोघे अटकेत

खालापूर तालुक्यात नंदनपाडा हे गाव आहे.  या गावात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा चर्चा झाली; परंतु हा प्रश्न कोणाला सोडवता आला नाही. यामुळे ८५ व्या वर्षी आजीबाई चिमणीबाई यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा प्रश्न तडीस लावण्याचा निर्धार केला; परंतु दुर्दैवाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थानमध्ये अतिरिक्त सचिवाच्या घरी ईडी! 

Post a Comment

Previous Post Next Post