शिक्षक बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची गुरुवारी निवड....

। अहमदनगर । दि.02 नोव्हेंबर । जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड तीन नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्षपदाची  संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी चौरंगी लढत झाली. यामध्ये बापुसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊली गटाने 20 जागा मिळवित एक हाती सत्ता मिळवली आहे. 

या निवडणुकीत गुरुकुल मंडळाचे एकमेव उमेदवार निवडून  आलेले आहेत. रोहकलेप्रणित गुरुमाऊली सदिच्छा मंडळाला आपले खातेही उघडता आलेले नाही.

शिक्षक बँकेत एक हाती सत्ता असल्यामुळे आता तांबे गट कोणाला अध्यक्षपदाची संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्या जिल्ह्यात अध्यक्षपदाची संधी आमूक व्यक्तीला मिळेल,अशी चर्चा सध्या सुरु आहे.  

---------

💥चहाच्या टपरीवरील कामगाराचा खून ; गुन्हा दाखल

💥मतदानाच्या दिवशी मतदान कल चाचणीस प्रतिबंध 

💥पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला 

Post a Comment

Previous Post Next Post