। मुंबई । दि.02 नोव्हेंबर 2022 । भारत निवडणूक आयोगाने १६६- अंधेरी (पूर्व) या महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित केली केली आहे. या निवडणुकीकरिता दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या मतदानाच्या दिवशी म्हणजेच दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० या कालावधीत मतदान कल चाचणी (EXIT POLL) घेण्यास तसेच EXIT POLL चे निकाल प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर किंवा अन्य माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे
---------
💥सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंध : जिल्हाधिकारी निधी चौधरी
💥कोविड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद : पालकमंत्री शंभूराज देसाई
💥सोनेवाडी सोसायटीवर स्वीकृत संचालकपदी पांडुरंग काळे व संपत दळवी बिनविरोध निवड