। अहमदनगर । दि.31 ऑक्टोबर । सीना नदीला आलेल्या पुरात कल्याण रोडवर पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागाच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू असताना बुरुडगाव रोडवरील बाबर मळा परिसरात नदी पात्रालगत त्याचा मृतदेह आढळून आला.
मागील आठवड्यात बुधवारी व गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर येऊन कल्याण महामार्गावरील पुलावरील वाहतूक बंद झाली होती. तब्बल 12 तासांपेक्षा अधिक काळ ही वाहतूक बंद होती.
या ठिकाणी नालेगाव येथील विशाल देवतरसे नावाचा एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता.
महापालिकेचे अग्निशमन अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांचे पथक त्याचा शोध घेत होते.
नगरमधील सीना नदी परिसरापासून वाकोडी, वाटेफळ, हातवळण, निमगाव गांगर्डा, सीना धरणापर्यंत विविध ठिकाणी पथकाने त्याचा शोध घेतला होता. अखेर बुधवारी सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--------
💥 सोनेवाडी सोसायटीवर स्वीकृत संचालकपदी पांडुरंग काळे व संपत दळवी बिनविरोध निवड
💥 राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार : शालेय शिक्षण मंत्री
💥 महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार