। अहमदनगर । दि.02 नोव्हेंबर । दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण करून चहाच्या टपरीवर काम करणार्या कामगाराचा खून केल्याची घटना मंगलगेट, कोठला येथे घडली. संजय छगन लिमगिरे (वय 48 रा. दर्गा दायरा, नगर) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांंविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयताचा पुतण्या सतीश राजू लिमगिरे (रा. शेलार मला रोड, दत्त कॉलनी, बुर्हाणनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. लिमगिरे हे एजाज शेख यांच्या चहाच्या टपरीवर काम करत होते. रविवार (दि. 30 ऑक्टोबर) रात्री जेवण झाल्यावर ते चहाच्या टपरीजवळ झोपले असताना दोघांनी त्यांना डोक्यात दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी झालेले संजय लिमगिरे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
-------
💥मतदानाच्या दिवशी मतदान कल चाचणीस प्रतिबंध
💥पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
💥रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा