। अहमदनगर । दि.09 ऑगस्ट । नगर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. नगर शहर आणि परिसरात रविवारी दुपारी चारपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे नगर परिसरालगत असणाऱ्या शेतीसोबत जिल्ह्यात अनेक भागांत खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत नगर जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ दिला आहे. हा इशारा खरा ठरल्यास नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
👉 मोहरम एकात्मिकतेचे प्रतीक : माजी आ.मोहन जोशी
नगर शहरात आणि तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सीना नदीला दुथडी पूर आला होता. यामुळे शेतीसह नदीकाठावरील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशी परिस्थिती पुन्हा रविवारी निर्माण झाली होती. श्रीरामपूर, राहुरी, राहाता, अकोले, तसेच अन्य तालुक्यांतही अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. भंडारदरा आणि मुळा पाणलोटातही जोरदार पाऊस सुरू आहे. श्रीरामपूर शहर व परिसरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
👉 कोरठण खंडोबा गुरुवारी श्रावण पौर्णिमा व रविवारी कुस्त्यांचा आखाड्याचे आयोजन
Tags:
Ahmednagar
