कोरठण खंडोबा गुरुवारी श्रावण पौर्णिमा‎ व रविवारी कुस्त्यांचा आखाड्याचे आयोजन‎


। अहमदनगर । दि.09 ऑगस्ट । लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान‎ असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान,पिंपळगावरोठ ा‎ ता पारनेर या राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्रावर श्रावण‎ पौर्णिमा(रक्षाबंधन)उ त्सव गुरुवारी (११ ऑगस्ट) आणि‎ कुस्त्यांचा आखाडा १४ ऑगस्टला होणार आहे.

 श्री खंडोबा‎ भक्त खंडू गुंजाळ राहणार कांदळी(वडगाव ) तालुका जुन्नर‎ यांनी ३ लाख रुपये खर्चाचा नवीन देणगी कक्षदान रुपात‎ देवस्थानला अर्पण केला असून या देणगी कक्षाचे उद्घाटन‎ श्रावण पौर्णिमा उत्सवात सकाळी ११ वाजता होईल. २‎ वर्षानंतर कुस्त्यांचा आखाडा देवस्थान जवळ भरणार‎ असल्याने कुस्तीप्रेमी भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह‎ आहे,

श्रावण पौर्णिमा ११ ऑगस्टला सकाळी देवाची मंगस्नान,‎ पूजा, साज शृंगार,अभिषेक,महाआरत ी होऊन भाविकांना‎ मंदिर दर्शनासाठी खुले होईल. सकाळी १० वाजता श्रीखंडोबा‎ उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा मिरवणूक वाजंत्री, ताफा व‎ ढोल, लेझीमच्या तालावर मंदिरातून प्रस्थान होईल.‎ रक्षाबंधनानिमित्त सर्व महिला वर्गाकडून श्रीखंडोबाला‎ भक्तीने राखी अर्पण करण्यात येते.नंतर घरोघर राखी‎ बंधनांचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.‎

Post a Comment

Previous Post Next Post