मोहरम एकात्मिकतेचे प्रतीक : माजी आ.मोहन जोशी

मोहरम निमित्त बारा इमाम कोटलाला शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने चादर अर्पण ;

मोहरम एकात्मिकतेचे प्रतीक : माजी आ.मोहन जोशी 

 


। अहमदनगर । दि.09 ऑगस्ट । मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी, पक्ष निरीक्षक वीरेंद्र किराड, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले. मोहरम हे एकात्मिकतेचे प्रतीक असून जातीय सलोख्याची भावना त्यानिमित्तानं सर्व धर्मीयांमध्ये असते, असे प्रतिपादन यावेळी बोलताना माजी आ. जोशी यांनी केले.*

यावेळी नगरसेवक आसिफ सुलतान, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. हनिफ शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे हनीफ मोहम्मद जहागीरदार, माजी नगरसेविका जरीना पठाण, रजिया शेख, सरकुंजा शेख, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, 

मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे,  क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते,  विनोद दिवटे, अरुण वाघमोडे, ब्लॉक काँग्रेसचे सागर इरमल, रवी शिंदे, निलेशदादा चक्रनारायण, अभिनय गायकवाड, उमेश साठे, इंजि. सुजित क्षेत्रे, महिला सेवादल काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कौसर खान आदींसह पक्षाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आ. जोशी म्हणाले की, भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान आहे. देशाला हिंदू, मुस्लिम एकतेची अनेक वर्षांची परंपरा आहे. धर्माधर्मामधील भाईचारा हा सामाजिक सलोख्यासाठी महत्त्वाचा आहे. पक्ष निरीक्षक वीरेंद्र किराड म्हणाले की, नगरची मोहरम ही भारतभर ओळखली जाते. भाविकांची मोठी श्रद्धा या ठिकाणी पाहायला मिळते.

किरण काळे म्हणाले की, दर वर्षी मोहरमच्या निमित्ताने सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी येथे होत असते.  मोहरमच्या निमित्तानं नगर शहरामध्ये हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये घडत आले आहे. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त या निमित्ताने शहरामध्ये ठेवला आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले. यावेळी बारा ईमाम कोठल्याचे मुजावर देखील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post