भाजप नेत्या चित्रा वाघ नाराज.. संजय राठोड यांना मंत्री नकोच...


। मुंबई । दि.09 ऑगस्ट । संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या व आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर नाराजी व्यक्त केली. राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणे दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटल आहे.

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

तसेच राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार आहे. ही लढाई जिंकणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राठोड यांना पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी क्लिनचीट मिळाली आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपदाचीही संधी दिली आहे. मात्र यावरुन आता वादाची शक्यता आहे.

चित्रा वाघ यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आय की, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post