दि अंबिका महिला बँकेच्या अध्यक्षपदी सौ.आशा मिस्कीन तर उपाध्यक्षा प्रा.पुष्पा मरकड
। अहमदनगर । दि.07 मे । दि अंबिका महिला सहकारी बँक लि. अहमदनगर बँकेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. निवडणुक निर्णय अधिकारी आर. के. रत्नाळे साहेब (उपनिबंधक सहकारी संस्था, नगर) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पदाधिकारी निवडीसाठी सभा पार पडली.
या सभेत बँकेच्या अध्यक्षपदी सौ.आशा दिलीप मिस्कीन तर उपाध्यक्षपदी प्रा. पुष्पा मोहनराव मरकड यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदाची सूचना प्रा. सौ. सुमन गोसावी यांनी केली तर अनुमोदन ऍड. सौ. शारदा लगड यांनी दिले. उपाध्यक्षपदाची सूचना सौ. शांता मोरे यांनी केली तर अनुमोदन सौ. शोभना चव्हाण यांनी दिले.
आर. के. रत्नाळे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पदाधिकारी निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मावळत्या अध्यक्षा सौ. सुमन गोसावी व उपाध्यक्षा सौ. शांता मोरे यांना सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
----------------
खालील बातम्या वाचा...
घरगुती गॅसची किंमत 1 हजाराच्या टप्प्यात
जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी पदभार स्वीकारला
पाण्याचा वापर काटकसरीने करा : मनपाचे आवाहन
संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको
