। अहमदनगर । दि.06 मे 2022 । नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे .राज्य शासनाच्या असलेल्या सर्व योजना तसेच
येथील कामकाजाला कशा पद्धतीने आपल्याला गती देता येईल याकरता आपली प्राथमिकता राहील असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
दरम्यान आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी यावेळी उपस्थित होते.
Tags:
Maharashtra