। नवीदिल्ली । दि.07 मे 2022 । घरगुती वापरासाठी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसच्या (एलपीजी) दरात शनिवारी पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
तेल उत्पादक कंपन्यांनी जाहीर केलेल्या वाढीमुळे 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 50 रुपये अधिक असेल.
त्यामुळे एका सिलिंडरच्या किमतीने 1000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामधून आता सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागली असल्याचे चित्र आहे.
रविवारी 19-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत देखील 102.50 रुपयांनी वाढली होती, जी पूर्वीच्या 2,253 रुपयांच्या तुलनेत आता 2,355.50 रुपये आहे.
5 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 655 रुपये झाली आहे. गॅसची किंमत वाढत चालल्याने सर्वसामान्याचे बजेट कोलमडत आहे.
-----------------------
खालील बातम्या वाचा...
जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी पदभार स्वीकारला
पाण्याचा वापर काटकसरीने करा : मनपाचे आवाहन
नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको
बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा करा: उपमुख्यमंत्री अजित पवार
Tags:
Breaking