। अहमदनगर । दि.05 मे 2022। अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी जी. डी खानदेशे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण महर्षी म्हणून त्यांचे योगदान खूप मोलाचे असून याच कामाची दखल घेत मराठा सेवा संघ व जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्था यांच्यावतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
खानदेशे साहेब गेली अनेक वर्षे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सचिव पदावर आहेत. 100 पेक्षा जास्त शाखा, विद्यालये, कॉलेज, प्राथमिक शाळा, इंजिनियर कॉलेज, डीएड कॉलेज आदींचा शैक्षणिक कारभार ते पहात आहेत. दरम्यान त्यांच्या कामाची दखल या आधी स्वतः राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील घेतली होती.
महाराष्ट्रामधील अनेक शैक्षणिक संस्था त्यांचे मार्गदर्शन व प्रेरणा घेत आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे कामगिरी केली. सर्वसामान्य, तळागाळातील समाजापर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक कल्पक योजना देखील राबवल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना सोबतच त्यांनी दिलेले पर्यावरण विषयक जनजागृतीचे धडे आज नागरिकांच्या स्मरणात आहेत.
दरम्यान त्यांच्या शिक्षण क्षेत्रामधील या भरीव कामगिरीची दखल घेत मराठा सेवा संघ व जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्था यांच्यावतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.
--------------------
विलासराव देशमुख अभय योजनेतून जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ग्राहकांना मिळणार लाभ
पैसे टाकून थंडगार शुद्ध पाणी देणारी योजना उपयुक्त ठरेल : तनपुरे
विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले काम करुन विद्यापीठाचे नांव जगभर करु या : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
Tags:
Ahmednagar