। अहमदनगर । राहुरी । दि.03 मे 2022 । राहुरी नगरपरिषदेची मोबाईल वाॅटर एटीएम ही पैसे टाकून थंडगार आरोचे शुद्ध पाणी देणारी योजना शहरातील नागरीकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास बाजार समितीचे माजी सभापती अरूण तनपुरे यांनी व्यक्त केला.
“वापरा व हस्तांतरित करा” या तत्त्वावर सोमवारपासून राहुरी शहरात सुरू करण्यात आलेल्या जीवनधारा मोबाईल वाॅटर एटीएम योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिल कासार,बाळासाहेब उंडे, प्रकाश भूजाडी, गजानन सातभाई,सुर्यकांत भुजाडी ,अशोक आहेर,संजय साळवे,राहुरी नगर परिषद प्रशासनातील विकास घटकांबळे, योगेश शिंदे, काकासाहेब आढागळे, महेंद्र तापकिरे,अर्जुन बर्गे, सुनिल कुमावत उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष कासार म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून शहरवासीयांना अल्प दरात पाणी मिळणार अाहे. राहुरी नगर परिषदेवर प्रशासक असल्याने मुख्याधिकारी बांगर हे प्रशासकीय अधिकारी आहेत. मात्र आजच्या मोबाईल वाॅटर एटीएम उद्घाटन कार्यक्रमात त्यांचा सहभाग दिसून आला नाही.
Tags:
Ahmednagar