। अहमदनगर । दि.05 मे । रेल्वेचा धक्का लागून झालेल्या अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. मृताचे सुमारे वय 40 वर्षे आहे. नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
जखमी अवस्थेत असलेल्या या इसमास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
अंगात आकाशी रंगाचा हाफ बाहीचा टी-शर्ट व पांढरे रंगाचे बनियान व राखाडी रंगाचा फुल पँन्ट आहे. उजवे हातावर ओम असे गोंदलेले व हातात स्टीलचे कडे, भगवा रंगाचा दोरा बांधलेला दिसत आहे.
केस काळे, कमरेला काळे रंगाचा करदोरा बांधलेला आहे. वरील वर्णनाचे अनोळखी पुरुषाबाबत काही माहिती समजल्यास त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्याचे
सपोनि राजेंद्र सानप व पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags:
Breaking