। अहमदनगर । दि.04 मे 2022 । श्रीरामपूर शहरात इदगाह मैदान, संजयनगर, वॉर्ड नं. 1 परिसरात राहणारा देवेंद्र पांडुरंग म्होपरे (रा. जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, इदगाह रोड) याने ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जाणूनबुजून इदगाह भिंतीवर झेंडा लावण्याच्या उद्देशाने ओट्यालगत पायर्यांवर चढून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार रात्री 11.30 वाजता घडला. याप्रकरणी जब्बार आयुब शेख (रा.इदगाह मैदानाजवळ, संजयनगर, वॉर्ड नं.1,श्रीरामपूर) या गॅरेज चालक तरुणाने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून देवेंद्र पांडुरंग म्होपरे याच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात तेढ निर्माण करण्याचा
गुन्हा दाखल करण्यात आला असून अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, डिवायएसपी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.
Tags:
Crime