। अहमदनगर । सोलापूर । दि.12 मार्च । अक्कलकोट-गाणगापूर रोडवर (जि.गुलबर्गा, कर्नाटक) कर्नाटक हद्दीत अफजलपूर-बळुरगी रोडवर गाडीचा अपघात होवून या अपघातामध्ये 5 भाविक ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
देवदर्शन करुन परतताना झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात नगर शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात शुक्रवारी दुपारच्या दरम्यान झाला असून या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत गुलबर्गा जिल्हयातील अफजलपूर पोलिस ठाण्यात सुरु होते. अपघातातील मयत सर्वजाण नगर जिल्हयातील असल्याचे समजते.
दरम्यान, नगर शहरातील काही तरुण देवदर्शनसाठी गाणगापूर येथे जात होते. नंबरवरुन ही गाडी नगर जिल्हयातील असल्याचे पाहून या तरुणांनी मदतकार्य सुरु केले. यातील वैभव सांगळे यांनी स्थानिक पोलिस आणि नगरमधील नगरसेवक निखिल वारे यांना या अपघाताची माहिती दिली.
त्यांनी गाडीच्या नंबरवरुन संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता, हे कुटुंब तपोवण रोड येथील राहणारे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तेथील नातेवाईकांना याची माहिती दिली.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 4 महिला व चालकाचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुले बचावली असून जखमी आहेत. याबाबत अफझलपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यत सुरु होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
हे देखील वाचा...छत्रपती संभाजी महाराज स्मृतिदिनानिमित्त अनाथ आश्रमास साहित्याची भेट
हे देखील वाचा...नगर शहरात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण
हे देखील वाचा...२० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान : अजित पवार