छत्रपती संभाजी महाराज स्मृतिदिनानिमित्त अनाथ आश्रमास साहित्याची भेट

 


। पुणे । दि.12 मार्च । छत्रपती संभाजी महाराज स्मृतिदिनानिमित्त पुणे जिल्हा युवक काँग्रेस व मराठा जोडो अभियानच्या वतीने अनाथ आश्रमा येथे विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती उध्दव शिवले यांनी सांगितले आहे.

पुणे येथे छञपती संभाजी महाराज स्मृतिदिनानिमित्त पुणे जिल्हा युवक काँग्रेस व मराठा जोडो अभियानच्या वतीने बकोरी येथील ‘माहेर अनाथ आश्रमास’ विविध उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले.

यावेळी मराठा जोडो अभियानचे अध्यक्ष उद्धव शिवले, मराठा जोडो अभियान महासचिव अविनाश करंडे, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा संघटक दिनेश भुजबळ, संभाजी ब्रिगेडचे दत्ता चव्हाण, मराठा जोडो अभियान युवक प्रदेशाध्यक्ष निलेश रोडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी राजमाता जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्षहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच जय जिजाऊ ,शिवराय, जय स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता.

Post a Comment

Previous Post Next Post