। अहमदनगर । दि.12 मार्च । अहमदनगर शहरात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण मोहिम अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिम सुरु केली आहे. या साठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. नगर शहरात देखील शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण सुरु झाले आहे.
६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास पटावर नोंदविले जाणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक भागात तसेच परिसरात रेल्वेस्टेशन बाजार गावाबाहेरील पाल, विट्ट भट्टी, रस्त्यावर भिक मागणारे बालके ऊस तोडकामगारांची बालके, स्थलांतर केलेली कूटूंबबातील बालकांचा शोध घेऊन त्यांची नोंद करणे,
व या बालकांना मोफत शिक्षणा चा हक अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शाळेत दाखल करून शिक्षणाचा हक प्राप्त करून देण्यासाठी शासकीय स्थरावरुन दिलेल्या नियोजना नुसार सदर मोहिम राबवली जात असल्याची माहिती प्रगणक शिक्षक प्रसाद शिंदे यांनी दिली.
बालके ही आपल्या देशा चे भविष्य आहे. शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रव हात आणण्यासाठी सर्व स्थरावर, प्रबोधन प्रयत्न व्हावे. आणि शिक्षण द्यावे. आणि राष्ट्रीय कामात शिक्षक सहभागी होऊन नेहमीच प्रामाणिक कामे करत आहेत.
Tags:
Ahmednagar