। नागपूर । दि.12 मार्च । एकमेकांवरील प्रेम आणि घरच्यांकडून संभाव्य विरोध यातून अल्पवयीन प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलत धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे.
१८ वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय तरुणीने काल रात्री ८ च्या सुमारास कन्हान रेल्वे पुलाजवळील १०० मीटर दूर अंतरावरील कामठी रेल्वे ट्रॅकवर हातात हात घालून हावडा- अहमदाबाद या धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हे दोघेही शहरातील जयभीम चौक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घरच्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागल्याने आणि विरोध असल्याने या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मृत तरुणाचे नाव आदित्य कुरील(१८) तर मुलगी ही १६ वर्षाची अल्पवयीन आहे.
दोन दिवसांपूर्वी हे दोघेही बेपत्ता झाल्याने मुलीच्या घरच्यांनी कामठी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असता पोलिसांनी हरवल्याची तक्रार नोंदवित तपासाला गती दिली. मात्र कुठेही त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता.
त्यानंतर काल रात्री या दोघांनीही धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पोलीस या घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
हे देखील वाचा...गाणगापूरवरुन परतणार्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात
हे देखील वाचा...२० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान : अजित पवार
हे देखील वाचा...पत्रकार कल्याण निधीमध्ये १५ कोटींची वाढ
हे देखील वाचा...आज 57 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या बाधितांची रुग्णसंख्येत भर